भाऊ बीज (Bhai bij 2020).. भाऊ आणि बहीण यांच्यातील अतूट प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचा सण. या सणाच्या दिवशी भावा-बहिणीचं हे पवित्र नातं आणखी दृढ होतं. या दिवशी, भाऊ त्यांच्या बहिणींना भेटायला जातात, तर बहिणी पूर्ण आदर आणि सन्मानाने बंधुंच्या कपाळावर टिळक लाऊन त्यांचे औक्षण करतात. बहिण भावाला यशस्वी आणि दीर्घायु होण्याची शुभेच्छा देतात. यावेळी भाऊ बहिणींसाठी खास भेटवस्तूही आणतात. या दिवशी काही विशेष उपाय केले तर भाऊ व बहिणीमधील हे नाते आणखी दृढ आणि अतूट होते.


भाऊबीजेच्या दिवशी करायेच उपाय


अष्टगंधचा टिळा लावावा


रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते. तर भाऊबीजेला टिळा लावण्याची परंपरा आहे. परंतु, या दिवशी तुम्ही कुंकाऐवजी अष्टगंधाचा टिळा लावला तर ते अधिक शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की यामुळे भाऊ आणि बहीण दोघांच्या आनंदात वाढ होते.


हातावर सप्तरंगी धागा बांधा


भाऊ बीजेच्या दिवशी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून श्रीफळ देतात. या दिवशी बहिणीने भावाच्या मनगटावर सप्तरंगी धागा बांधला तर अधिक शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की भाऊ आणि बहीण दोघांच्याही जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि आयुष्य आनंदी होते.


काळा पेन भेट द्या


या दिवशी लेखणीची विशेष पूजा केली जाते. असं म्हणतात की या दिवशी भावाने पेनाची पूजा करावी आणि तो बहिणीला भेट द्यावा. जर पेन काळ्या रंगाचा असेल तर तो अधिक चांगला मानला जाईल.


दक्षिणेकडे दिवे लावा


या दिवशी भाऊबीज साजरी केल्यानंतर, बहिणींनी संध्याकाळी दक्षिणेकडे दिवा लावला तर त्याचा चांगला परिणाम होतो. मोहरीच्या तेलाचा दोन पट दिवा लावावा. या उपायाने भाऊ व बहिणींच्या आयुष्यातील प्रत्येक आपत्ती दूर होऊ शकते.


लवंगाने हा उपाय करा


जर भाऊ किंवा बहीण यांच्यातील संबंध गोड नसतील किंवा एखाद्या गोष्टीवरुन दीर्घकाळ वाद निर्माण झाला असेल तर या दिवशी भावाच्या डोक्यावर मोहरी, लवंग आणि उडीद टाकावे आणि कापूर जाळावा. यामुळे नात्यातील कटुता दूर होते.