पाटणा: बिहारचे पुढचे मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील हे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एनडीएच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यात नितीश कुमारांची एनडीएच्या गटनेतेपदी निवड झाली. त्यानंतर नितीश कुमारांनी समर्थक आमदाराचे पत्र घेऊन राज्यपालांची भेट घेतली. सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे.


राज्यपालांना भेटून आल्यानंतर नितीश कुमारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "मुख्यमंत्री व्हायची माझी इच्छा नव्हती. परतु भाजप नेत्यांच्या आग्रहाखातर हे पद स्वीकारण्यास तयार झालो आहे. मुख्यमंत्री भाजपचा व्हावा अशीच माझी इच्छा होती."


संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून सत्तास्थापनेचा दावा केला. नितीश यांच्यासोबत हम पक्षाचे अध्यक्ष जितनराम मांझी, व्हिआयपी पक्षाचे मुकेश सहनी हे नेतेही राज्यपालाच्या भेटीवेळी उपस्थित होते. उद्या म्हणजे सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे.


नितीश कुमार बिहारच्या 37 व्या मुख्यमंत्र्याच्या रुपात सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भाजपला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असले तरी त्यासाठी अजून कुणाचेही नाव जाहीर करण्यात आले नाही.


बिहारमध्ये भाजप दोन उपमुख्यमंत्रीपद निर्माण करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी भाजपच्या गटनेतेपदी निवड झालेले तारकिशोर प्रसाद आणि रेणूदेवी यांची नावे चर्चेत आहेत तर सुशिलकुमार मोदींचा पत्ता कट केल्याची चर्चा आहे.


महत्वाच्या बातम्या: