नवी दिल्ली : ‘काश्मीरमध्ये सुरु असलेल्या दहशतवाद्यांच्या थैमानात शहीद झालेल्यांमध्ये 5 जण मुस्लिम आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या देशभक्तीवर संशय घेणाऱ्यांनी त्यातून धडा घ्यावा.’ असं उपरोधिक आवाहन एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे...


गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी नेते आणि ओवेसी यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. त्याचाच आधार घेत ओवेसी यांनी परखड उत्तर दिलं आहे.

दरम्यान, ‘काश्मीरमध्ये सत्ताधारी भाजप आणि पीडीपी हे दोन्ही पक्ष नौटंकी करत असून, फक्त मलई खाण्याचे उद्योग सुरु आहेत.’ असा आरोपही ओवेसी यांनी केला आहे.

काश्मीर खोऱ्यात ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा

दुसरीकडे काल (मंगळवार) ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणांनी काश्मीरचं खोरं दुमदुमून गेलं. सुंजवाँमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अखेरचा निरोप देताना काश्मीरच्या नागरिकांनी पाकिस्तानला लाखोल्या वाहिल्या.

अतिरेक्यांनी लष्करी तळांवर हल्ले सुरु केले आहेत. ते हल्ले परतवत असताना दोन दिवसात एकूण 6 जवान शहीद झाले. तर एक नागरिक मृत्युमुखी पडला. त्यामुळे काश्मीरच्या खोऱ्यात पाकिस्तानविषयी असंतोष निर्माण झाला आहे.

सुभेदार मदन लाल चौधरी, सुभेदार मोहम्मद अशरफ मीर, हवलदार हबीबुल्ला कुरैशी, नायक मंजूर अहमद आणि लान्स नायक मोहम्मद इकबाल यांना या हल्ल्यामध्ये वीरमरण आलं.

संबंधित बातम्या :

गेल्या 44 दिवसात तब्बल 26 जवान शहीद