नवी दिल्ली : परराष्ट्र खात्यात मराठमोळी व्यक्ती महत्त्वाच्या पदावर विराजमान झाली आहे. मूळचे कोल्हापरचे असलेले आयएफएस अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांची परराष्ट्र मंत्रलयाच्या महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. ज्ञानेश्वर मुळे यांची परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवपदी बढती झाली आहे.
परराष्ट्र मंत्रालयात जगभरातल्या भारतीयांसंदर्भात एक स्वतंत्र विभाग आहे. या खात्याचे सचिव म्हणून ज्ञानेश्वर मुळे काम पाहणार आहेत.
ज्ञानेश्वर मुळे यांनी भारताचे अमेरिकेतील राजदूत म्हणून कार्य पाहिले आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेला अधिकारी म्हणून मुळे यांची ख्याती आहे.
ज्ञानेश्वर मुळे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट या गावचे सुपुत्र आहेत. त्यांची साहित्य कारकीर्दही मोठी आहे. मुळे यांचे 'माती,पंख आणि आकाश' हे आत्मचरित्र तरुणांसाठी प्रेरणादायी पुस्तक म्हणून ओळखलं जातं.