नवी दिल्ली : अर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. डी.के.शिवकुमार यांचा आज (बुधवारी) उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 25 लाख रूपयांच्या वैयक्तिक जामीनावर त्यांची सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शिवकुमार यांना आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी ईडीने गेल्या महिन्यात अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती. बुधवारी सकाळीच तिहार तुरुंगात जाऊन काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिवकुमार यांची भेट घेतली होती. डी. के. शिवकुमार यांनी कर चुकवला असून करोडोंचे व्यवहार केले आहेत, असा आरोप त्यांच्यावर ईडीने केला होता. दरम्यान, उच्च न्यायलयाने तुरूंगात असलेल्या शिवकुमार यांची देश सोडून न जाण्याच्या अटीसह २५ लाख रूपयांच्या वैयक्तिक जामीनावर सुटका केली आहे.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2017 साली डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी तसेच त्यांच्या कार्यालयामध्ये छापे टाकले होते. या छाप्यावेळी सुमारे 8.82 करोड रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली होती. त्यानंतर अर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी ३ सप्टेंबर रोजी शिवकुमार यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली होती.
Money Laundering Case : काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांना जामीन मंजूर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Oct 2019 07:46 PM (IST)
उच्च न्यायलयाने तुरूंगात असलेल्या शिवकुमार यांची देश सोडून न जाण्याच्या अटीसह २५ लाख रूपयांच्या वैयक्तिक जामीनावर सुटका केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -