नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना एक कोटी रुपयांपर्यंत तात्काळ कर्ज मिळण्याची तरतूद केली आहे. अवघ्या 59 मिनिटात म्हणजेच एका तासाच्या आत एक कोटीचं कर्ज उपलब्ध होणार आहे.


सध्या 59 मिनिटांत एक कोटीचं कर्ज मिळण्याची सोय वर्तमान व्यावसायिकांसाठीच आहे. नव्या व्यावसायिकांनाही लवकरच ही सुविधा उपलब्ध होईल. कर्ज मंजूर होताच एका आठवड्यात रक्कम बँक खात्यात जमा होईल. कर्जासाठी https://psbloansin59minutes.com/signup या लिंकवर अर्ज करायचा आहे.

कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुढील माहिती तयार ठेवायची

·जीएसटी आयडेंटिफिकेशन क्रमांक, जीएसटी युजर आयडी, पासवर्ड

·आयकर ई-फायलिंग पासवर्ड, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन किंवा बर्थ किंवा मागच्या तीन वर्षांचे आयटीआर एक्सएमएल फॉर्मॅटमध्ये

·करंट अकाऊंट – नेटबँकिंग युजरनेम, पासवर्ड, किंवा मागच्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट पीडीएफ

·डायरेक्टर/ पार्टनर/ प्रोपरायटर माहिती: बेसिक, पर्सनल, केवायसी, शैक्षणिक माहिती, फर्मच्या मालकीची माहिती

अर्ज मंजूर झाल्यावर प्रक्रिया शुल्क एक हजार रुपये + जीएसटी भरावा लागेल. या कर्जाच्या व्याजावर दोन टक्क्यांची अनुदानातून सूट देण्यात येईल.