नवी दिल्ली : यंदा सरासरीच्या 98 टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान खाते अर्थात आयएमडीचे संचालक के.जी.रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.


विशेष म्हणजे मध्य भारतात जून ते सप्टेंबरदरम्यान 100 टक्के पाऊस पडेल. जुलै महिन्यात सरासरी 96 टक्के, तर ऑगस्टमध्ये 99 टक्के पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गोव्यात बरोबर 8 जूनला मान्सून हजेरी लावेल. तर मुंबईत यायला मान्सूनला 13 ते 14 जून उजाडेल असं रमेश यांनी स्पष्ट केलं.

गेल्या वर्षी झालेल्या उत्तम पावसानंतर यंदा पुन्हा अल निनोचा प्रभाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्यात तथ्य नसल्याचं याआधीच हवामान खात्यानं स्पष्ट केलं. त्यामुळे शेतीची कामं सुरु करण्याची लगबग वाढणार आहे.