नवी दिल्लीः दहावी, बारावी, ग्रॅज्युएशन असो किंवा पीएचडी सर्व पदवी प्रमाणपत्र आता इतिहास जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांना आता डिजिटल डिग्री देण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच ही डिग्री डिजिटल लॉकरमध्येही सुरक्षित ठेवली जाणार आहे.

 

सध्याची युवा पिढी आणि त्यांच्या गरजा लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. हे महत्वपूर्ण पाऊल उचलण्यासाठी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहाय्याने तांत्रिक बाबींची पूर्तता चालू आहे, अशी माहिती मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

 

देशातील सर्व विद्यापीठांचा डाटाबेस तयार करण्यात येणार असून यामध्ये सीबीएसई बोर्डाचा देखील समावेश करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल पदवीचं वितरण यापुढे दिक्षांत समारंभात करण्यात यईल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली.