CRICKET : सध्या भारतात आयपीएलचे (Indian premier league) जोरदार सामने सुरू आहेत. क्रिकेटचं वेड असणाऱ्यांसाठी आयपीएलचं पू्र्ण सिजन एखाद्या सणापेक्षा कमी नाही. कारण भारतात क्रिकेटला प्रचंड लोकप्रियता आहे. देशातील प्रत्येक गाव-गावात, शहरात क्रिकेट खेळलं जातं. यामध्ये शालेय वयाच्या मुलांपासून ते तरूण आणि मध्यम वयाची माणसं क्रिकेट खेळताना दिसून येतात. अर्थात, बहुतांश लोक फक्त क्रिकेट खेळतात. पण लोकांना क्रिकेटशी संबंधित फारशी माहिती नसते. आजपर्यंत तुम्ही क्रिकेट खेळला असाल, क्रिकेट पाहिलं असेल, पण CRICKET या शब्दाचा फुल फॉर्म आहे तरी काय? हे कधी माहिती पडलं नसेल किंवा कुणी विचारलंही नसेल. पण आज आपण क्रिकेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया...
काय आहे CRICKET या शब्दाचा फुल फॉर्म?
भारतात क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आहे. भारतीय उपखंड, आफ्रिका आणि युरोपमधील काही देशांत क्रिकेट खेळ खेळला जातो. क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका सर्वांत जुनी आणि प्रतिष्ठीत कसोटी मालिका आहे. इंग्लंडसारखं ऑस्ट्रेलियातही क्रिकेट प्रचंड खेळला जातो. क्रिकेटला अनेकवेळा तुम्ही ऐकलं असेल की, हा सभ्य लोकांचा खेळ आहे. CRICKET च्या प्रत्येक शब्दामध्ये त्याच्या सभ्यतेचा अर्थ दडलेला आहे. हा अर्थ समजून घेतला तर कळेल की, क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ का म्हटलं जातं. एका Abbreviations.com या वेबसाईटवर मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकेट (CRICKET) या शब्दाचा फुल फॉर्म पुढीलप्रमाणे समजून घेऊया...
C- Customer Focus
R- Respect for Individual
I- Integrity
C- Community Contribution
K- Knowledge Worship
E- Entrepreneurship & Innovation
T- Teamwork
या प्रत्येक शब्दाचं आपापलं एक महत्त्व आहे. त्यामागे एक अर्थ दडलेला आहे. एखाद्या सर्वगुणसंपन्न व्यक्तीमध्ये जे सर्व 'सभ्य' गुणधर्म असतात ते CRICKET या शब्दांमध्ये दिसून येतात. यामुळे क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ म्हटल जातं. आता जर तुम्हाला कुणी विचारलं की, CRICKET चा फुल फॉर्म काय आहे तर बिनधास्तपणे वरील फुल फॉर्म फटाफट बोलून दाखवा. त्यामुळे ही नवीन माहिती तुमच्या मित्रांनाही समजेल आणि त्यांच्या सामान्य ज्ञानातही भर पडेल. तुम्ही हे सहज क्रिकेट खेळता करू शकता. मग तुम्हाला आता कळलंच असेल की, क्रिकेटला 'सभ्य' लोकांचा खेळ का म्हटलं जातं.