पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे गोव्यावर शोककळा पसरलेली आहे. याचा परिणाम पणजीसह गोव्यात धुलिवंदनचा उत्साह दिसून आलेला नाही. सरकारी पातळीवर राज्यभर होणारा शिमगोत्सव पूर्वीच रद्द करण्यात आला आहे. आज धुलिवंदनाचा उत्साह देखील पर्रिकर यांच्या निधनामुळे बघायला मिळाला नाही.


पणजी मधील आझाद मैदान यंदा सन्नाटा पसरल्याचे चित्र पहायला मिळाले. दरवर्षी येथे मोठ्या उत्साहात धुलिवंदन साजरे केले जाते.

यंदा पणजी मार्केट परिसरात उत्तर भारतीय नागरिक धुलिवंदन खेळत होते. जुन्या मार्केट जवळ रंग, पिचकाऱ्या, फुगे यांची दुकाने थाटण्यात आली होती. तिथून रंग घेऊन उत्तर भारतीय नागरिक होळी खेळत होते. काही ठिकाणी विदेशी पर्यटक देखील धूलिवंदनाचा आनंद लूटत असल्याचे पहायला मिळाले. दरम्यान ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जात आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 18 मार्च ते 24 मार्च दरम्यान गोव्यात दुखवटा घोषित केला आहे.