गोळीबाराची घटना समजल्यावर काही ग्रामस्थांनी ही घटना नंदीहळ्ळी यांच्या पत्नीला कळवली. लगेच अरुण यांना उपचारासाठी येळ्ळूर के एल ई हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.
अरुण यांच्या पत्नीने भाऊबंदकी हेच हत्येमागे कारण असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस आयुक्तासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी रात्री लगेच भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी हत्येच्या तपासाला प्रारंभ केला असून हत्येमागे भाऊबंदकी आहे की अन्य काही कारण आहे याचा तपास करत आहेत. अरुण नंदीहळ्ळी यांचे दोन विवाह झालेले आहेत. त्यांच्या शिक्षण संस्थेत देखील वाद सुरु आहेत. एक पत्नी धामणे येथे तर दुसरी अनगोळ येथे असते.
अरुण नंदीहळ्ळी यांनी विश्वभारत संस्थेत नोकरी लावतो म्हणून अनेकांकडून पैसे घेतले होते. नोकरी न लागल्यामुळे पैसे दिलेल्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला होता. काही दिवसांपासून त्यांना धमकीचे फोनही येत होते. या संबंधी त्यांनी आपल्या कुटुंबीयांना देखील सांगितले होते. काही जण आपल्या मागावर असल्याचे देखील अरुण यांनी आपल्या घरच्यांना सांगितले होते, अशी माहिती मिळाली आहे.