नवी दिल्ली: चीनसोबत सध्या सुरु असलेल्या तणावात भारतीय सैन्याच्या मदतीला एक मोठी ताकत आली आहे. भारतानं ध्रुवास्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. या ध्रुवास्त्र क्षेपणास्राचा वापर भारतीय लष्कराकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत केला जाणार आहे. क्विक रिस्पॉन्स देणारं हे क्षेपणास्त्र क्षणार्धात दुश्मनांच्या चिंधड्या उडवणार आहे.


'ध्रुवास्‍त्र' क्षेपणास्त्राची चाचणी ओदिशा येथील बालासोर येथे करण्यात आली. या क्षेपणास्त्राची रेंज चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे. ही चाचणी नुकतीच हेलिकॉप्टर विना करण्यात आली. डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (डीआरडीओ) द्वारा बनवलेल्या या क्षेपणास्त्राचं नाव आधी नाग असं होतं ते नंतर बदलून ध्रुवास्त्र केलं गेलं.


LAC वर आता हवाई योद्धा 'भारत' ड्रोनची निगराणी, काय आहेत खास गोष्टी?

भारत आणि चीनमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने भारतीय सैन्याला एलएसीसोबतच उंच आणि डोंगराळ भागात लक्ष ठेवण्यासाठी स्वदेशी ड्रोन उपलब्ध करून दिलं आहे.  'भारत' नावाचं ड्रोन डीआरडीओच्या टर्मिनल हॉलिस्टिक्स अनुसंधान प्रयोगशाळा (टीबीआरएल),चंदीगडद्वारे विकसित करण्यात आलं आहे. या ड्रोनमार्फत उंच आणि डोंगराळ भागात गस्त घालण्यास मदत होणार आहे. अधिकाऱ्यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, 'हे ड्रोन पूर्व लडाखमध्ये तैनात केलं जाण्याची शक्यता आहे. तसेच या ड्रोनच्या माध्यमातून उंच आणि डोंगराळ भागातील निगराणी वाढवली जाऊ शकते. तसेच सीमेवरील इतर भागांमध्ये हे ड्रोन तैनात करण्यात येणार का? असा प्रश्न विचारल्यावर यासंदर्भात सैन्यदलाकडून निर्णय घेण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

'भारत' ड्रोनची वैशिष्ट्य :




  • जगातील सर्वात हलतं आणि चपळ ड्रोन आहे भारत

  • नाईच व्हिजनचं फिचर देण्यात आलं आहे.

  • रियल टाइम व्हिडीओ रेकॉर्डची क्षमता आहे.

  • बालाकोट सारख्यं एअर स्ट्राइक करण्यासाठी सक्षण

  • आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि कॅमऱ्याची क्षमता आहे.

  • घनदाट जंगलांमध्ये लपलेल्या शत्रुंना ट्रॅक करण्याटी क्षमता

  • डिझाइन आणि टेक्नॉलॉजीमुळे रडारवर डिटेक्ट होत नाही

  • थंड वातावरणातही काम करण्यासाठी सक्षम