औरंगाबाद : उत्तराखंडमध्ये औरंगाबादच्या भाविकांची बस दरीत कोसळून अपघात झाला होता. यात दोन भाविकांना आपला जीवही गमवावा लागला. या अपघातातील जखमी भाविक त्याच अवस्थेत रेल्वेने महाराष्ट्रात पोहोचले.
औरंगाबादचे 35 भाविक 10 जुलैला चारधाम यात्रेला गेले होते. 21 जुलैला त्यांच्या बसला अपघात झाला. त्यातील जखमी रुग्णावर उत्तराखंडमध्ये उपचार सुरू होते. त्यांना उत्तराखंड सरकारनं 10 हजार मदत देत महाराष्ट्रात जाण्यास सांगितले.
उत्तराखंडचे अपघाग्रस्त भाविकांचा स्वखर्चाने मोडलेले हात-पाय घेऊन दोन दिवस रेल्वेने प्रवास आज पहाटे औरंगाबादमध्ये पोहोचले आणि आता त्याच्यावर औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 17 रुग्णावर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत.
खर तर महाराष्ट्रातील भाविक उत्तराखंडमध्ये अपघात झाल्यामुळे अडकले होते. त्यांना महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी सरकारची होती. मात्र सरकारच्या एकाही व्यक्तीने त्याची साधी चौकशीही केली नाही. त्यामुळे सर्वच स्तरातून आता संताप व्यक्त केला जातो आहे.
अपघातग्रस्त भाविकांचा जखमी अवस्थेत रेल्वेने उत्तराखंड ते महाराष्ट्र प्रवास!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2017 10:54 PM (IST)
उत्तराखंडमध्ये औरंगाबादच्या भाविकांची बस दरीत कोसळून अपघात झाला होता. यात दोन भाविकांना आपला जीवही गमवावा लागला. या अपघातातील जखमी भाविक त्याच अवस्थेत रेल्वेने महाराष्ट्रात पोहोचले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -