मूड देशाचा : आता निवडणुका झाल्यास भाजपला मोठा धक्का?
एबीपी माझा वेब टीम | 24 May 2018 08:13 PM (IST)
आगामी राजस्थान आणि मध्यप्रदेशातल्या निवडणुकीत मात्र भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.
मुंबई : देशात आता निवडणुका झाल्या, तर मोदी सरकारला सत्ता तर मिळेल, पण भाजपच्या जागा मात्र कमी होतील, असा अंदाज एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या सर्वेक्षणातून समोर आला आहे. 26 मे रोजी मोदी सरकारची 4 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे 2019 च्या निवडणुकांआधी यंदाचं वर्ष मोदींसाठी सेमिफायनल ठरलं आहे. एकीकडे विरोधकांनी सरकारविरोधी मोट बांधली आहे, तर दुसरीकडे पुन्हा पूर्ण बहुमतानं सत्तेत येऊ असं भाजपला विश्वास आहे. म्हणूनच देशाचा मूड काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वेक्षण केले. यात भाजपला गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी जागा मिळतील, असा निष्कर्ष समोर आला आहे. त्यामुळे भाजपला काठावरचं बहुमत मिळेल, असा अंदाज आहे. तिकडे आगामी राजस्थान आणि मध्यप्रदेशातल्या निवडणुकीत मात्र भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे.
लोकसभेसाठी महाराष्ट्रातील मतांची अपेक्षित टक्केवारी
लोकसभेसाठी देशाचा मूड (मतांची टक्केवारी)
लोकसभेसाठी देशाचा मूड – पूर्व भारत (मतांची टक्केवारी)
लोकसभेसाठी देशाचा मूड – पश्चिम व मध्य भारत (मतांची टक्केवारी)
लोकसभेसाठी देशाचा मूड – उत्तर भारत (मतांची टक्केवारी)
लोकसभेसाठी देशाचा मूड – दक्षिण भारत (मतांची टक्केवारी)
2019 च्या लोकसभेत कुणाला किती जागा?
VIDEO : मूड देशाचा : एबीपी न्यूज - सीएसडीएस महासर्वेक्षण