नवी दिल्ली: नोटाबंदीवर संसदेत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आज राज्यसभेतही याविषयी गंभीर चर्चा सुरु होती. मात्र, यावेळी एक क्षण असा आला की, पंतप्रधान मोदींसह संपूर्ण सभागृह पोट धरु हसू लागलं.


माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यानंतर समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी आपलं भाषण सुरु केलं. उपरोधिकपणे नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली.

'लोकं म्हणतात की, मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाबाबत खुद्द अर्थमंत्र्यांनाही माहिती दिली नव्हती. जर जेटलींना या निर्णयाबाबत माहित असतं तर त्यांनी माझ्या कानात येऊन नक्कीच सांगितलं असतं. कारण की ते मला ओळखतात.' त्यांच्या या वक्त्यावर सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी पंतप्रधान मोदी आणि जेटलींनाही आपलं हसू आवरलं नाही.

याचवेळी नरेश अग्रवाल यांनी मोदींवर टीकाही केली. 'या निर्णयाला समाजवादी पक्षाचा कधीही पाठिंबा नाही. जगातील काही देशांनी असे निर्णय घेतले होते. पण ते निर्णय तेथील हुकूमशहांनी घेतले होते. कोणत्या निवडून आलेल्या सरकारनं नव्हे.

VIDEO: