नोटाबंदीमुळे विकासाची गती मंदावेल, राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना चिंता
एबीपी माझा वेब टीम | 05 Jan 2017 11:48 PM (IST)
नवी दिल्ली : नोटबंदीमुळे विकासाचा रथ मंदावेल, अशी चिंता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे. पण नोटाबंदीमुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात कारवाई सुरु असल्याचं प्रमाणपत्रही त्यांनी मोदी सरकारला दिलं आहे. नोटबंदीच्या निर्णयावर राष्ट्रपतींनी पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. नोटाबंदीमुळे विकासाची गती मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला तात्पुरती मरगळ येऊ शकते. पण भ्रष्टाचार आणि काळ्या पैसेवाल्यांधातल्या लढाईला बळ मिळेल, असेही राष्ट्रपती म्हणाले. "नोटाबंदीमुळे गरिबांना त्रास होतो आहे. गरिबांना त्रास होऊ नये यासाठी सरकारनं पावलं उचलणं आवश्यक आहे. भविष्यात नोटबंदीचा गरिबांना फायदा होईल. पण ते तोपर्यंत कळ काढू शकणार नाहीत.", असं मत राष्ट्रपतींनी व्यक्त केलं.