नवी दिल्ली : जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद झाल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळू शकतात. कारण तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता आहे. एसबीआय बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी याबाबत माहिती दिली.


500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून बँका मालामाल झाल्या आहेत. कारण आतापर्यंत बँकांमध्ये 3 लाख 12 हजार कोटी जमा झाले आहेत. तर तब्बल 18 हजार कोटींची उलाढाल झाली आहे. एसबीआयमध्ये सर्वाधिक रक्कम जमा झाली आहे. या सर्व गोष्टींमुळे बँकाच्या व्याजदरात घट होण्याची शक्यता आहे.

नोटा बंद करण्याचा मोदींचा निर्णय

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलत, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी आणि नोटा बदलण्यासाठी लोकांच्या बँकांबाहेर रांगा लागल्या. मात्र, लोकांनी रोख रक्कम बँकेत जमा केल्याने बँकांमधील पैसा वाढला आहे. त्यामुळे व्याजदरात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.