नोटा बदलल्यानंतर आजपासून बोटाला शाई लागणार
एबीपी माझा वेब टीम | 16 Nov 2016 08:49 AM (IST)
नवी दिल्ली : देशातील सर्व बँकांमध्ये आजपासून नोटा बदलल्यानंतर मतदानाप्रमाणे निशाणी म्हणून ग्राहकाच्या बोटावर शाई लावण्यात येणार आहे. पैसे बदलण्यासाठी तेच तेच लोक सातत्याने रांगेत उभे राहात असल्याने गर्दी वाढत आहे. त्यामुळे ग्राहकाला शाई लावण्याचा निर्णय घेतल्याचं केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास मंगळवारी जाहीर केलं. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर त्या बदल्यासाठी तसंच जमा करण्यासाठी नागरिक बँकांबाहेर प्रचंड गर्दी करत आहे. परंतु पैसे बदल्यासाठी वारंवार तेच लोक बँकांबाहेर रांगा लावून नोटा बदलून घेत आहेत. यामध्ये गर्दी वाढत आहे. अनेक जणांनी काहींना कमिशन देऊन या कामाला लावलं आहे. परिणामी गरजूंना पैसे बदलून मिळण्यास अडचणी येत आहेत, अशी तक्रार येऊ लागल्याने सरकारने शाई लावण्याचा अनोखा उपाय केला आहे.