नागपूर : 11 वर्षीय मुलाची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या, कारण अस्पष्ट, महाजन लेआऊट परिसरातील खळबळजनक घटना
-------------------------------------------------


कोल्हापूर : आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणारी महिला ताब्यात, दोन पीडित तरुणींची सुटका, शनिवार पेठेत पोलिसांची कारवाई

-------------------------------------------------

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार #पाऊस, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्यातील वीज, टेलिफोन सेवा ठप्प

-------------------------------------------------

कोल्हापुरातील महालक्ष्मी आणि जोतिबा मंदिरातील दानपेट्या अचानक उघडल्या, रकमेची मोजदाद सुरु

-------------------------------------------------

मुंबई : भिवंडीत पंजाब नॅशनल बँकेबाहेर रांगेत घुसखोरी करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांचा लाठीमार, गोपाल नगर परिसरातील घटना
-------------------------------------------------

उस्मानाबादमध्ये दोन ठिकाणी जुन्या नोटा जप्त, उमरगा चौरस्ता येथे 91 लाख 50 हजाराच्या नोटा जप्त, तर आयुर्वेदिक कॉलेजजवळ 1 कोटी 85 लाख जप्त

नोटाबंदीविरोधात तृणमूलच्या मोर्चात शिवसेना सहभागी होणार, राष्ट्रपतींचीही भेट घेणार

हेडलाईन्स :

1. राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात हजर राहणार, संघावरील गांधी हत्येच्या आरोपाबद्दल आज भिवंडी कोर्टात सुनावणी

2. नोटाबंदीवरुन सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी, उद्धव ठाकरे ममता बॅनर्जींसोबत, हिवाळी अधिवेशन तापण्याची शक्यता

3. पाच दिवासांपासून बंद असलेलं कांदा मार्केट आजपासून सुरु होणार, नोटांची अडचण टाळण्यासाठी उत्पादकांना ऑनलाईन पैसे मिळणार

4. नोटा बदलणाऱ्यांच्या बोटांवर शाईचं निशाण, मर्यादेपेक्षा जास्त रक्कम खात्यावर आल्यास सवलतींना मुकणार, ईबीसी आणि बीपीएल धारकांना इशारा

5. जिल्हा बँका, पतसंस्थांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई, सरकराच्या आदेशामुळे पतसंस्थांना मोठा फटका, तर शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प

6. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर 5 वर्षांची बंदी, मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, बेकायदेशीर कारवाया केल्याचा ठपका

7. पेट्रोल आणि डिझेल दीड रुपयांनी स्वस्त, मध्यरात्रीपासून नव्या दरांची अंमलबजावणी, सामान्यांना दिलासा

8. व्हॉट्सअॅप युजरसाठी गूड न्यूज, बहुप्रतीक्षित व्हिडीओ कॉलिंग सेवेला सुरुवात