मुंबई : देशभरातील बँका आज आणि उद्या बंद असतील. आज चौथा शनिवार आणि उद्याचा रविवार अशा दोन दिवस बँकांना सुट्ट्या असल्याने एटीएमवरच लोकांना अवलंबुन राहावं लागणार आहे.
एटीएमबाहेरच्या रांगाही आता काही प्रमाणावर कमी झाल्या आहेत. त्यामुळे पैसे काढणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो आहे. मात्र, ज्यांना बँकेत जुन्या नोटा खात्यात जमा करायच्या आहेत. त्यांना सोमवारपर्यंत वाट पाहावी लागेल.
बहुतांशी एटीएममधून फक्त 2 हजाराची नोट येत आहे. त्यामुळे मुबलक पैसे हातात येत असले तरी सुट्ट्या पैशांचा प्रश्न मात्र गंभीर बनत चालला आहे. दोन हजाराची नोट असेल तर लोक पैसे काढणं टाळत असल्याचंही दिसून येत आहे. कारण दोन हजार रुपये सुट्टे मिळणं कठीण होऊन बसलं आहे.
काळ्या पैशाविरोधात ठोस पाऊल उचलत केंद्र सरकारने 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. मात्र, या निर्णयामुळे अनेकांचे दैनंदिन व्यवहार पुरते कोलमडले आहेत.