Bihar Election Result 2025 Congress Winner List: बिहारचा रणसंग्राम एकतर्फी जिंकण्यात एनडीएला यश (Bihar Election Result 2025) आलंय. 243 जागांपैकी 202 जागा मिळवत भाजप, जेडीयू, लोजप या पक्षांनी एकतर्फी बाजी मारत एनडीएला बहुमत मिळवून दिलंय. या निवडणुकांमध्ये एनडीएनं जोरदार मुसंडी मारत एकतर्फी विजय मिळवलाय.

Continues below advertisement


भाजपला 89 तर जेडीयूनं 85 जागा मिळवल्यात. तर काँग्रेसला अवघ्या 6 आणि तेजस्वी यादवांच्या राजदला 25 जागांवर समाधान मानवं लागतंय. आता बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागलीय. मुख्यमंत्री पदाच्या निर्णयासाठी एनडीएच्या नेत्यांमध्ये आज बैठका होण्याची शक्यता आहे.


बिहारमध्ये महागठबंधनने संपूर्ण 243 विधानसभेच्या जागा लढवल्या. यामध्ये राष्ट्रीय जनता जलने 143 जागा, काँग्रेसने 61 जागा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने 20 जागा आणि विकसनशील इंसान पार्टीने 12 जागा लढवल्या. यामध्ये बिहारमध्ये काँग्रेसला किती जागा मिळाल्या, काँग्रेसचे कोणते उमेदवार विजयी झाले, याबाबतची संपूर्ण यादी पुढील प्रमाणे आहे.





बिहारमधील काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी- (Congress Winning Candidates List Bihar Election 2025)


1. वाल्मिकी नगर विधानसभा मतदारसंघ- सुरेंद्र प्रसाद (काँग्रेस)


2. चणपटीया विधानसभा मतदारसंघ- अभिषेक रांजन (काँग्रेस)


3. फोर्ब्सगंज विधानसभा मतदारसंघ- मनोज विश्वास (काँग्रेस)


4. अरारिया विधानसभा मतदारसंघ- अबिदुर रहमान (काँग्रेस)


5. किशनगंज विधानसभा मतदारसंघ- एमडी. कमरुल होडा (काँग्रेस)


6. मनिहारी विधानसभा मतदारसंघ- मनोहर प्रसाद सिंह (काँग्रेस)


भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास- (Bihar Election Result 2025)


बिहारमध्ये सत्तेच्या आकड्यांचा विचार करता भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलाय. 2010 सालानंतरची बिहरामधली ही भाजपाची सर्वात बहारदार कामगिरी आहे. बिहारच्या विधानसभेत भाजपला 89 तर जदयूला 85  जागा मिळाल्यात. एनडीएचे दोन्ही प्रमुख पक्ष असलेल्या भाजपा आणि जेडीयुला तुल्यबळ जागा मिळाल्याने आता उत्सुकता आहे ती मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार याची.. निवडणुकीआधी भाजपनं जाणीवपूर्वक मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करणं टाळलं. नीतिशकुमारांचं नाव घोषित न केल्यानं भाजपला वेळोवेळी त्यांचा रोषही सहन करावा लागला. पण आत्ताच्या परिस्थीतीत केंद्रीय पातळीवरच्या गणितांचा विचार करता नितीश कुमारांना दुखावणं भाजपाला राजकीयदृष्ट्या परवडणारं नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे दाट शक्यता अशी आहे की लवकरच नितीश कुमार नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.


बिहार निवडणुकीच्या निकालाचे सर्व अपडेट्स, VIDEO: