PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी WHO प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम यांचं गुजराती नामकरण केले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी WHO प्रमुखांचं नामकरण केले. मनसुख मांडविया (Dr Mansukh Mandaviya) यांनी मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 
 
मोदी म्हणाले की, 'WHO चे महासंचालक माझे चांगले मित्र आहेत. जेव्हा जेव्हा ते मला भेटले तेव्हा तेव्हा ते एक गोष्ट सांगायचे, मी आज जो काही आहे ते भारतीय गुरुमुळेच आहे. लहानपणापासून मला ज्या शिक्षकांनी शिकवले, ते सर्व भारतीय होते. माझ्या आयुष्यातील महत्वाच्या टप्प्यात भारतीय शिक्षकांचं मोलाचं योगदान आहे. आज सकाळी मला भेटल्यावर ते म्हणाले की, मी पक्का गुजराती झालो आहे. ' WHO चे महासंचालकांनी मला त्यांचं नाव गुजराती ठेवा असं सांगितलं. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या पवित्र भूमीवर माझे मित्राला मी तुळशी भाई म्हणून पुकारतो, असे मोदी म्हणाले.  


पाहा व्हिडीओ... 


 






बुधवारी झालेल्या कार्यक्रमात WHO चे प्रमुख डॉ टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी गुजराती भाषेतून संबोधनाची सुरुवात केली. प्रथम त्यांनी हात जोडून नमस्कार केला आणि नंतर 'केम छो" असे विचारले. यानंतर लोकांनी जेव्हा याचे उत्तर दिले, तेव्हा त्यांनी मजमा असेही म्हटले. गेब्रेयसस म्हणाले की, डब्ल्यूएचओ-ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन हा योगायोग नाही. यादरम्यान डब्ल्यूएचओ प्रमुखांनी आपल्या गुजराती संवादाने सर्वांची मने जिंकली. त्यांचे गुजराती ऐकून पीएम मोदीही हसून टाळ्या वाजवू लागले.


'भारत सरकारचे आभार'


WHO महासंचालक म्हणाले, “आम्ही सुरू करत असलेले WHO-ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिन पुराव्यावर आधारित पारंपारिक औषधांना बळकट करण्यासाठी तसेच विज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यास मदत करेल. नेतृत्वासाठी मी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारचा आभारी आहे. ते म्हणाले, "केंद्र स्थापन करण्यासाठी USD 250 दशलक्ष गुंतवणुकीसाठी आणि परिचालन खर्चासाठी 10 वर्षांच्या वचनबद्धतेबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. ज्या दिवसापासून मी पंतप्रधान मोदींशी बोललो, त्यांची वचनबद्धता आश्चर्यकारक होती आणि हे केंद्र चांगल्या हातात असेल हे माहीत होतं."