नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अतिरेकी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या 12 संशयित अतिरेक्यांना ताब्यात घेतलं आहे. दिल्ली आणि जवळपासच्या राज्यातून छापा टाकून या 12 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

 

या 12 संशयित अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात आयईडीचा साठाही पोलिसांनी जप्त केला आहे.

 

दिल्ली-एनसीआरच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये जैश-ए-मोहम्मदचे संशयित अतिरेकी घुसले आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी महिन्याभरापूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला माहिती दिली होती.

 

या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी छापासत्र सुरु केलं, ज्यात 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेले संशयितांचा राजधानीत घातपात करायचा डाव होता का, याचा तपास पोलिस करत आहेत.

 

हल्ल्याची शक्यता पाहता दिल्ली आणि जवळच्या भागात अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे दिल्लीत सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.