सलमान आणि 'सुलतान'च्या दिग्दर्शकाविरोधात तक्रार
एबीपी माझा वेब टीम | 03 May 2016 05:57 AM (IST)
मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या न्यायालयात बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि 'सुलतान' चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'सुलतान'मधील काही सीन्स मुझफ्फरनगरच्या मोरना परिसरात चित्रित करण्यात आले आहेत. पण सिनेमात ते ठिकाण हरियाणातील रेवडी असल्याचं दाखवण्यात आलं आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एहतेशाम सिद्दीकी असं या तक्रारकर्त्याचं नाव आहे. या गोष्टीमुळे मुझफ्फरनगरच्या नागरिक संतापले आहेत, असा दावा सिद्दीकी यांनी केला आहे. न्यायदंडाधिकारी आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.