Delhi Fire In Baby Care Center : नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi Fire Updates) बेबी केअर हॉस्पिटलला (Baby Care Hospital) भीषण आग (Fire Updates) लागली आहे. या आगीत सहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 12 बालकांना आगीतून सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती समोर आली आहे. 


राजधानी दिल्लीतील विवेक विहार परिसरात एका बेबी केअर हॉस्पिटलला आग लागली. या दुर्घटनेत सहा नवजात बालकं दगावली आहे. शनिवारी रात्री जवळपास साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. पाहता पाहता आगीचे लोळ बाहेर पडू लागले. क्षणार्धातच आगीनं भीषण रौद्ररूप धारण केलं. आगी इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, अद्याप आगाची कारण समोर आलेलं नाही, याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचताच त्यांनी मुलांना केंद्रातून सुखरूप बाहेर काढण्यास सुरुवात केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी 12 नवजात मुलांची सुटका केली. पण, दुर्दैवानं सहा चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. 






12 चिमुकल्यांची सुखरुप सुटका 


दिल्ली अग्निशमन सेवा (डीएफएस) प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितलं की, विवेक विहारमधील ब्लॉक बी, आयआयटी जवळील बाल संगोपन केंद्रात आग लागल्याची माहिती मिळाली. गर्ग यांनी सांगितलं की, "एकूण नऊ अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. बचाव कार्य सुरू आहे आणि आतापर्यंत 12 नवजात बालकांना वाचवण्यात यश आलं आहे."