Delhi Fire : दिल्लीतील द्वारका सेक्टर-13 मधील 'सबाद अपार्टमेंट' या बहुमजली इमारतीतील एका फ्लॅटला आग लागल्याची घटना मंगळवारी (दि. 10) घडली आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागली आहे. यादरम्यान, घरातील एका व्यक्तीने आपल्या दोन मुलांसह जीव वाचवण्यासाठी इमारतीतून उडी घेतली. मात्र, या तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेपूर्वी अग्निशमन विभागाला सकाळी 10 वाजून 01 मिनिटांनी आगीची माहिती देण्यात आली, त्यानंतर तात्काळ मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अपार्टमेंटच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे दिसून येत आहे. 

अग्निशमन विभागाची माहिती

अग्निशमन विभागाने घटनास्थळी तात्काळ प्रतिसाद दिला आणि 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याच्या प्रयत्नात केला जात आहे. अग्निशमन विभागाने सांगितले आहे की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि घटनास्थळी सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

अग्निशमन विभागाने कुठल्याही अफवांपासून विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे. उर्वरित तपशील आणि आगीचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी अग्निशमन विभागाच्या अधिकृत निवेदनाची प्रतीक्षा केली जात आहे. घटनास्थळी बचाव व मदतकार्य प्राधान्याने सुरू आहे. दरम्यान, द्वारकामधील 'सबद अपार्टमेंट'मध्ये ही आग लागली होती, जे एमआरवी स्कूलजवळ स्थित आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत राहणाऱ्या अनेक रहिवाशांनी असा आरोप केला की, जेव्हा अपार्टमेंट कमिटीला या घटनेची माहिती देण्यात आली तेव्हा त्यांनी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. या संपूर्ण प्रकरणात दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sonam Raghuvanshi Case : 'राजाला मारून टाका, 20 लाख देते'; डोंगर चढताना 'किलर्स' थकले, सोनम रघुवंशी ओरडली; व्रताच्या दिवशीच संसार केला उद्ध्वस्त

Sonam Raghuvanshi Case : स्टेजवरच ढसाढसा रडला होता प्रियकर राज; सोनम म्हणाली, राजाशी लग्न करत असले, तरी....; कुटुंबही चक्रावलं