Sonam Raghuvanshi case: इंदूरहून मेघालयातील शिलॉंगमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यातील राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. मेघालय पोलिसांच्या म्हणण्यानुसार पत्नी सोनम रघुवंशी हिनेच आपला प्रियकर राज कुशवाह याला हाताशी धरून राजा रघुवंशीची हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. दरम्यान मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली असून मुख्य आरोपी सोनमला उत्तर प्रदेशातील गाजीपुर येथून ताब्यात घेण्यात आला आहे. 

सोनमने राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी प्रियकर राज कुशवाह तसेच इतर आरोपींना आर्थिक मदत आणि नोकरीचे आमिष दिल्याचं तपासात उघड झालं. सोनम रघुवंशी च्या लग्नात तिचा प्रियकर राज कुशवाह देखील उपस्थित होत्या अशी माहिती समोर आली. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन आरोपींची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

प्रियकराला हाताशी धरून नवऱ्याला संपवले

सोनमने मधुचंद्रासाठी शिलॉंग ट्रीप आखत राजा रघुवंशीला निर्जन ठिकाणी नेण्याची योजना आखली. ज्या दिवशी राजा रघुवंशीचा खून झाला त्यादिवशीचा सोनम रघुवंशीचा सीसीटीव्ही समोर आला होता. यात हेल्मेट धरण्यासाठी राजा रघुवंशी तिला बोलवत होता मात्र ती घाईघाईने कोणालातरी मेसेज करत होती. पोलिसांच्या तपासानुसार सोनम प्रियकरासह इतर दोन आरोपींसोबतही संपर्कात होती. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार सोनमनेच आपला प्रियकर राज कुशवाह याला हाताशी धरून राजा रघुवंशीची हत्या केली. आपल्या तीन मित्रांना प्रियकर राज यांनी सुपारी देऊन हे हत्याकांड घडवल्याचे देखील समोर आलं आहे. दरम्यान या पाचही जणांची चौकशी केली असता 23 मेला राजा रघुवंशीची हत्या नेमकी कशी झाली याची सविस्तर माहिती समोर आली आहे. 

लग्नाच्या पाचव्या दिवशी हत्येचा कट

23 मे ला राजा रघुवंशीची हत्या करण्याच्या काही मिनिट आधी आरोपींनी हत्या करण्यास नकार दिला होता. आपण हत्या करणार नाही असे त्यांनी सोनमला सांगितलं होतं. मात्र सोनवणे ऐनवेळी डोकं चालवलं आणि आरोपीही हत्या करण्यासाठी तयार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशी ने लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशीच राजा रघुवंशीची हत्या करण्याचा कट रचला होता. यासाठी आपल्या शाळकरी मित्रांसोबत एका कॅफेत तिने भेट घेतली होती. तिथेच राजाच्या हत्येचा प्लॅनिंग करण्यात आलं. यासाठी आरोपी प्रियकर राज कुशवाह याने आपले मित्र आकाश राजपूत आनंद कुरुमी आणि विशाल चव्हाण यांनाही हत्येच्या कटात सामील करून घेतलं. त्यानंतर आकाश आनंदाने विशालने मिळून राजाची हत्या केली. 

घटनेच्या दिवशी नक्की झालं काय?

घटनेच्या दिवशी 23 मे ला सोनम फोटोशूट करण्याच्या भाड्याने राजाला घेऊन कोरसा परिसरात गेली. हा सगळा भाग डोंगराळ असून इथे लोकांची वर्दळही कमी असते. या ठिकाणी जात असताना तिन्ही आरोपी हिंदी मध्ये गप्पा मारत दोघांमध्ये मिसळले. मेघालयात हिंदी बोलणारे लोक भेटल्याने राजा रघुवंशी ही त्यांच्याशी गप्पा मारण्यात गुंग झाला. टेकडी चढून गेल्यानंतर सोनमने थकल्याचा बहाणा केला. व ती पाठीमागे चालू लागली. तिन्ही आरोपी आणि राजा रघुवंशी ने काही अंतर गप्पा मारत पार केले. 

काही वेळ डोंगर चढवून पुढे गेल्यानंतर मारेकऱ्यांनी सोनंशी संवाद साधला आणि राजा रघुवंशीची हत्या करणार नाही असं सांगितलं. ऐन वेळेस हत्या करणार नाही सांगितल्यानंतर सोनम बिथरली. तिने ऐन वेळेस डोकं चालवलं आणि मारेकऱ्यांना 20 लाख रुपयांची ऑफर दिली. एवढ्यावरच ती थांबली नाही तिने राजाच्या खिशातून 15000 रुपये काढले आणि त्या आरोपीला दिले. पैसे पाहून आरोपींचं पुन्हा मतपरिवर्तन झालं आणि तिघांनी मिळून राजा रघुवंशीची हत्या केली. 

सोनमने इशारा देताच राजावर वार झाले 

दरम्यान निर्जन स्थळी कुणी नसल्याचे पाहून सोनवणे ओरडून राजाची हत्या करण्याचा सिग्नल मारेकऱ्यांना दिला. सोनवणे सिग्नल देता चा राजा सोबत गप्पा मारणाऱ्या आनंद आकाश आणि विशालने सोबत आणलेली हत्यारे बाहेर काढत राजाच्या डोक्यात वार केले. अचानक हल्ला झाल्याने राजा स्वतःचा बचाव करू शकला नाही आणि धारदार शस्त्रांचा घाव बसल्याने काही कळायच्या आतच राजाचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी जवळच असणाऱ्या दर इतर राजाचा मृतदेह फेकला आणि तेथून पळ काढला.