नवी दिल्ली : दिल्ली निवडणूकांचे बिगुल वाजले असून दिल्ली काबीज करण्यासाठी पक्षांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. अशातच आज अनेक दिग्गज आपला निवडणुक अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपला निवडणुक अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजप नेते विजेंद्र गुप्ता रोहिणीदेखील आपला अर्ज दाखल करणार आहेत. तर आम आदमी पार्टी सोडून काँग्रेसमध्ये समिल झालेल्या अलका लांबा चांदनी चौक येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.


दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया 14 जानेवारी पासून सुरू झालेली आहे. 21 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 8 फेब्रुवारी रोजी निवडणुक होणार असून 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.





उमेदवारी अर्ज भरण्याआधी बाल्मीकि मंदिरात पूजा करणार केजरीवाल


दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी त्यांचा भव्य रोड शो होणार आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आपला उमेदवारी अर्ज 16 जानेवारी रोजी दाखल केला. अरविंद केजरीवाल आपल्या सिविल लाइन येथे असलेल्या घरातून सकाळी जवळपास 10:30 वाजता निघणार आहेत. त्यानंतर ते घराजवळ असलेल्या बाल्मीकि मंदिरात पूजा करून रोड शोला सुरुवात करणार आहेत.


प्रतिपक्ष विजेंद्र गुप्ता दाखल करणार उमेदवारी अर्ज


दिल्ली विधानसभेचे नेते प्रतिपक्ष आणि भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांना रोहिणी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. विजेंद्र गुप्ता सकाळी 9 वाजता रोहिणी परिसरात असलेल्या घरातून निघतील आणि एसडीएम कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.





अलका लांबा निवडणूक अर्ज दाखल करणार


आम आदमी पार्टीचा राजीनामा दिल्यानंतर अलका लांबा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढणार आहेत. त्या चांदणी चौक येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी अलका लांबा यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या आहेत की, मी उद्या चांदणी चौक विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ट्रॅफिक जाम, पैसे आणि वेळेचं नुकसान होऊ नये म्हणून मी आणि माझ्या सर्व साथीदारांनी निर्णय घेतला आहे की, मी एकटी जाऊन माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.


विधानसभेच्या 70 जागांसाठी आठ फेब्रुवारीला मतदान


दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आठ फेब्रुवारीला मतदान होणार असून 11 फेब्रुवारीला याचा निकाल घोषित करण्यात येणार आहे. मागील वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष दोन नंबरवर होता. मात्र, त्यांना केवळ तीनच जागा मिळाल्या होत्या. 70 पैकी 67 जागांवर आपचे उमेदवार निवडून आले होते.


70 जागांसाठी 13750 मतदान केंद्र


70 जागांसाठी राज्यभरात 13750 मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे. तर 2689 जागी मतदान होणार आहे. यासाठी 90 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ व्यक्तीसाठी पोस्टाद्वारे मतदान करण्याची सोय करण्यात आलीय. त्यासाठी पाच दिवस अगोदर अर्ज करावा लागणार आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखेसह दिल्लीत आचारसंहिता लागू केली आहे. परिणामी सरकार कोणत्याच योजनेची घोषणा करू शकणार नाही.


22 फेब्रुवारी विधानसभा होणार बरखास्त


विद्यमान विधानसभा कार्यलय मुदत संपत असल्याने 22 फेब्रुवारीला बरखास्त होणार आहे. 14 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यासर सुरुवात झाली असून 21 जानेवारी हा अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. 22 जानेवारीला अर्ज छाननी होणार असून 24 जानेवारीला अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. विधानसभेच्या 70 जागांपैकी 12 जागा या आरक्षित आहे, तर 58 जागा खुल्या वर्गातील आहे.


संबंधित बातम्या : 


Delhi Election : भाजप निवड समितीची बैठक पूर्ण; आज उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता


सीएएवरुन भारतात जे सुरु आहे ते दु:खद : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला