Delhi Bomb Blast CCTV footage: राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या परिसरात सोमवारी संध्याकाळी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल 15 जण जखमी झाले होते. एका कारमध्ये असलेल्या स्फोटकांच्या साहाय्याने हा आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला. हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. बुधवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या घटनेबाबत निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून तपासयंत्रणांनी स्फोटाचे अनेक धागेदोरे शोधून काढले आहे. यामध्ये अनेक डॉक्टर्सचा समावेश आढळून आला आहे. (Delhi Red fort Blast news)

Continues below advertisement

दिल्लीतील या स्फोटानंतर घटनास्थळावरील काळीज पिळवटून टाकणारे अनेक फोटो समोर आले होते. त्यानंतर आता स्फोट झाला त्या क्षणाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. सोमवारी संध्याकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या परिसरात हा स्फोट झाला. तत्पूर्वी ज्या कारमध्ये स्फोटके होती, ती आय 20 कार 3 वाजून 18 मिनिटांनी लाल किल्ल्याच्या पार्किंगमध्ये दाखल झाली. त्यानंतर 6 वाजून 23 मिनिटांनी ही कार पार्किंगमधून निघाली आणि 6 वाजून 52 मिनिटांनी स्फोट झाला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटापूर्वी रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहनांची गर्दी दिसत आहे. हा स्फोट झाला तेव्हा सर्व वाहने सिग्नलवर थांबली होती. सिग्नल सुटल्यानंतर वाहने पुढे सरकत असतानाच अचानक हा स्फोट झाला होता. स्फोट झाल्यानंतर प्रचंड मोठा आवाज आणि आगीचा मोठा लोळ उठला. त्यानंतर कारच्या बाजूला असणाऱ्या रिक्षा आणि इतर गाड्यांची वाताहात झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, मृतांपैकी काहीजणांचे मृतदेह छिन्नविछिन्न झाले होते. त्यांच्या शरीराचे तुकडे काही अंतरावर जाऊन पडले होते.

Delhi Blast News: प्रजासत्ताक दिनाला स्फोट घडवण्याचा कट आखला होता?

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट आखण्यात आला होता. त्यासाठी डॉ. मुजम्मिल आणि डॉ. उमर नबी या दोघांनी लाल किल्ला परिसराची रेकी होती. या सगळ्यांनी मिळून प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला उडवण्याचा कट आखला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच स्फोटासाठी जी गाडी वापरण्यात आली होती, त्यामध्ये डॉ. मोहम्मद उमर हा होता. त्याने आत्मघाती हल्ला केला. डीएनए चाचणीत गाडीतील मृतदेह मोहम्मद उमर याचाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

आणखी वाचा

ना शार्पनेल, ना छर्रे, नाही खिळे; मग एवढे लोक ठार कसे? दिल्ली बॉम्बस्फोटानंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा