अहिल्यानगर : श्री साईबाबा (Saibaba) साईबाबा संस्थानविषयी विविध समाजमाध्यमांतून आक्षेपार्ह विधाने करणारे अजय गौतम यांनी आज अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहाता न्यायालयात हजर राहून आपली चूक मान्य केली आहे. साईबाबा व साईबाबा संस्थानबाबत असलेले माझे गैरसमज दूर झाले असून यापुढे मी कोणतेही चुकीचे वक्तव्य, मुलाखत, चर्चा किंवा भाष्य करणार नाही.” असा खुलासाच त्यांनी न्यायालयासमोर दिला. यावेळी, त्यांनी शिर्डी साईबाबा मंदिराचे दर्शन करण्यासाठी मी 1995 साली पहिल्यांदा आलो होतो. मुंबईवरुन शिर्डी (Shirdi) साईबाबांसाठी तेव्हा बस असायच्या, त्या बसने मी पहिल्यांदा शिर्डीत आलो होतो, अशी आठवणही गौतम यांनी सांगितली.
सन 2023 मध्ये श्री साईबाबांविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानने अशा प्रकारची विधाने करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध राहाता येथील न्यायालयात कायदेशीर दावा दाखल केला होता. ज्यामध्ये अजय गौतम यांचा समावेश होता, जे मूळ दिल्लीचे रहिवाशी आहेत. दरम्यानच्या, काळात त्यांचे साईबाबांसंदर्भातील गैरसमज दूर झाल्याने आज त्यांनी न्यायालयात माफीनामा सादर केला आहे. त्यानंतर, श्री साईबाबांच्या मध्यान्ह आरतीसाठीही त्यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
दरम्यान "शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत 2014 साली धर्म संसद झाली. त्यावेळी 13 आखड्याचे चार शंकराचार्य उपस्थिती होते. त्यावेळी सर्वांनी मिळून साईबाबांविषयी एक प्रस्ताव तयार केला होता. मात्र, आज मला साईबाबांचा आलेला अनुभव मी आताच्या शंकराचार्य यांना सांगणार आहे, असेही अजय गौतम यांनी म्हटले. साईबाबांविषयी अपप्रचार केला जात आहे. साईबाबांच्या मंदिरात होणाऱ्या पूजा अर्चना सर्व हिंदू परंपरेनुसार केल्या जातात. सोशल मीडिया कधीही साईबाबांच्या भक्तांना साई बाबांपासून दूर करू शकत नाही. मात्र, साईबाबांविषयी सुरू असलेला अपप्रचार आता थांबवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असल्याचेही गौतम यांनी म्हटलं.
साईबाबांच्या मूर्तींना वाराणसीतही झाला होता विरोध
दरम्यान, गतवर्षी उत्तर प्रदेशातही साईबाबांच्या मूर्तीवरुन वाद निर्माण करण्यात आला होता. वाराणसी शहरातील मंदिरांमधून सनातन रक्षक सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे साईबाबांच्या मूर्ती हटवायला सुरुवात केली. सनातन रक्षक संस्थेने शहरातील 14 मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती हटवून त्यांचे गंगेत विसर्जन केले होते. देशभरात साईबाबांना मानणारा मोठा भक्त समुदाय आहे, त्यामुळे वाराणसीमधील या घटनेवरुन अनेक ठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला होता.
हेही वाचा
दिल्लीतील भीषण स्फोटाचा निषेध, केंद्रीय कॅबिनेटमध्ये ठराव संमत; कट रचणाऱ्यांना शोधण्याचा निर्धार