Defence Ministry : भारतीय लष्कराने चीन (china) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी एका उपग्रहाचा प्रस्ताव ठेवला होता, त्याला संरक्षण मंत्रालयाने (Defence Ministry) मंगळवारी मंजुरी दिली. संरक्षण मंत्रालयाने मोठी घोषणा करत भारतीय लष्करासाठी 4000 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या समर्पित उपग्रहाचा प्रस्ताव आहे. यामुळे लष्कराच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होणार असल्याची माहिती लष्करी सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.


लष्कराची पाळत ठेवण्याची क्षमता होणार मजबूत 
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय लष्कराच्या मेड इन इंडिया उपग्रहाच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या संरक्षण परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या उपग्रहामुळे सीमावर्ती भागात लष्कराची पाळत ठेवण्याची क्षमता आणखी मजबूत होणार आहे. सूत्रांनी सांगितले की, GSAT 7B उपग्रहाच्या प्रकल्पाचे काम भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या भागीदारीत केले जाईल. भारतीय वायुसेना आणि नौदलाकडे आधीच समर्पित उपग्रह आहेत आणि या परवानगीनंतर लवकरच लष्कराकडेही हा उपग्रह असेल.


 






 


विशेष म्हणजे, भारतीय लष्कर एप्रिल-मे 2020 पासून चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) ड्रोनसह पाळत ठेवण्याच्या क्षमतेला बळकट करण्याच्या दिशेने काम करत आहे. संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितले की, इस्रोने तयार केलेला उपग्रह देशातील स्वदेशी उद्योगांचा विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मेक इन इंडिया कार्यक्रमातही मदत करेल.


हेही वाचा>