नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी चीनच्या सैनिकांना 'नमस्ते' म्हणत अभिवादन केलं. सिक्कीमच्या दौऱ्यावर असलेल्या सीतारमन यांनी चीनला लागून असलेल्या नथुला सीमेला भेट दिली.


चीनच्या सैनिकांशी संवाद साधत त्यांना नमस्ते म्हटल्यानंतर चिनी भाषेत नमस्तेला काय म्हणतात, असंही त्यांनी विचारलं. चीनच्या सैनिकांनी भारतीय संरक्षण मंत्र्यांचं नमस्ते स्वीकारत नमस्तेला चीनी भाषेत 'नी हाऊ' असं म्हणत असल्याचं सांगितलं.

या संपूर्ण संभाषणाचा व्हिडिओ निर्मला सीतारमन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. सिक्कीम दौऱ्यावर असताना सीतारमन यांनी आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. डोकलाम परिसराची हवाई पाहणी करण्याची योजना त्यांनी आखली होती. मात्र खराब हवामानामुळे ही पाहणी पूर्ण होऊ शकली नाही.

https://twitter.com/DefenceMinIndia/status/916904341411323904