नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. या मोहीमेत अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. स्वत: पंतप्रधान अनेक वेळा हातात झाडू घेऊन साफसफाई करताना दिसतात. पंतप्रधान मोदींची स्वच्छता मोहीम पुढे नेण्यासाठी अनेक लोक यात सहभागी होत आहेत. याचदरम्यान सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होत आहे. महत्त्वाचं म्हणजे हे पोस्टर पाहून पंतप्रधान मोदींनाही हसू आवरलं नाही. स्वच्छता अभियाना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हे पोस्टर आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन कोट केलं आहे. नैनीताल महापालिकेच्या रस्त्यावर लागलेल्या या पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. पंतप्रधान मोदींना टॅग करुन एका ट्विटराईटने हे पोस्टर ट्वीट केलं. यानंतर पंतप्रधानांनी हे ट्वीट कोट करुन लिहिलं की, "हाहा! स्वच्छतेचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी सिनेमाची मदत घेतली, फारच कल्पक" https://twitter.com/sahucar/status/851445984076865540 https://twitter.com/narendramodi/status/851799504177082372 ‘दीवार’ च्या प्रसिद्ध डायलॉगवर पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोस्टरवर 70 च्या दशकातील सुपरहिट सिनेमा "दीवार" चा प्रसिद्ध डायलॉग आहे. या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, "मां मेरे साथ रहेगी." तर शशी कपूर म्हणतात, "मां मेरे साथ रहेगी." मात्र यात आई निरुपा रॉय यांचा डायलॉगमुळे ट्विस्ट आहे. निरुपा रॉय म्हणतात, "नहीं, जो पहले शौचालय बनवाएगा, मां उसके साथ रहेगी." ओरिजनल डायलॉग काय? खरंतर "दीवार"चा प्रसिद्ध डायलॉग अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यातील आहे. डायलॉगमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, “मेरे पास घर, बंगला है, गाडी है, पैसे हैं, बँक बॅलेंस है, तुम्हारे पास क्या है?" शशी कपूर म्हणातात , "मेरे पास मां है."