Covovax for Children : देशात लवकरच 7 ते 11 वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणाला (Child Vaccination) सुरुवात होण्याची शक्यता आहे. सरकारने औषध नियामक मंडळाकडे 7 ते 11 वयोगटातील मुलांच्या लसीकरणात कोवोवॅक्स (Covovax) कोरोना लसीच्या आपात्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ज्ञ समितीने DCGI  कोवोवॅक्स लसीच्या आपात्कालीन वापराला मान्यता देण्याची शिफारस केली आहे. अंतिम मंजुरीसाठी अहवाल भारतीय औषध नियामक मंडळाकडे (DCGI) पाठवण्यात आला आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने ( SII - Serum Institute of India) केंद्र सरकार आणि नियामक मंडळाकडे 16 मार्च रोजी लसीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरीसाठी परवानगी मागितली होती. 


सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय औषध मानक नियंत्रण मंडळाच्या (CDSCO) कोरोनासंबंधित विशेष तज्ज्ञ समितीने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (Serum) या अर्जावर चर्चा केली आणि 7 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोवोवॅक्स लसीच्या आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी शिफारस केली.


लसीच्या वापराला मंजुरीसाठी सीरमची शिफारस


तज्ज्ञ समितीने एप्रिलमध्ये झालेल्या शेवटच्या बैठकीत सीरम कंपनीकडून अर्जाबाबत अधिक माहिती मागवली होती. DCGI ने 28 डिसेंबर रोजी कोवोव्हॅक्सला प्रौढांसाठीच्या लसीकरणात आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली होती. 9 मार्च रोजी काही अटींसह मंडळानं 12 ते 17 वर्षे वयोगटाच्या लसीकरणात या लसीच्या वापरासाठी मान्यता देण्यात आली.


देशात 16 मार्च 2022 रोजी 12 ते 14 वयोगटातील लहान मुलांचे लसीकरण सुरू झाले. गेल्या वर्षी 16 जानेवारी रोजी देशव्यापी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आलं. फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण गेल्या वर्षी 02 फेब्रुवारीपासून सुरू झालं.


महत्त्वाच्या इतर बातम्या