Amarnath Yatra 2022 : अमरनाथ यात्रेला लवकरच सुरुवात होणार आहे. या यात्रेसाठी पहिली तुकडी भाविकांचा पहिला समूह जम्मूवरून (Jammu) 29 जूनला रवाना होणार आहे. शहरात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी आता जम्मूमध्ये अतिरिक्त पाच हजार सैनिकांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांचा कारवायांना आळा घालण्यासाठी अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. 43 दिवसांच्या अमरनाथ यात्रेला 30 जूनपासून सुरूवात होत आहे. कोरोनामुळे अमरनाथ यात्रा दोन वर्ष रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यंदा यात्रेला भाविकांची मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पोलिसांकडून सुरक्षेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 


गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान या वर्षी होणाऱ्या अमरनाथ यात्रेत अडथळा आणण्यासाठी हल्ला करू शकतो. त्यासाठी स्टिकी बॉम्ब किंवा चुंबकीय बॉम्बचा वापर करण्यात येऊ शकतो. गेल्या काही दिवसांत जम्मू आणि काश्मीर पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांनी सीमेपलीकडून ड्रोनद्वारे पाठवलेल्या अनेक स्टिकी बॉम्बसह चुंबकीय बॉम्ब जप्त केले आहेत. सतर्कतेचा इशारा देत पोलिसांनी सर्वसामान्यांना वाहन चालवण्यापूर्वी एकदा संपूर्ण वाहन तपासण्याचे आवाहन केलं आहे.


लेफ्टनंट गव्हर्नर यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला
जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी सुरक्षा व्यवस्था आणि इतर तयारींचा आढावा घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी अधिकाऱ्यांनी सिन्हा यांना सुरक्षा परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली आणि यात्रेसंबंधित विविध व्यवस्थांबाबत चर्चा केली. अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिन्हा यांनी लष्करासह केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसह जम्मू पोलिसांनी तयार केलेल्या सुरक्षा व्यवस्थेसह सर्व मूलभूत गरजांसाठीच्या योजनांचाही आढावा घेतला.


महत्त्वाच्या इतर बातम्या