मुंबई: जागतिक स्तरावर लहान मुलांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणारी नोव्हावॅक्स ही लस 90 टक्के प्रभावी असल्याची माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी दिली आहे. सीरम इन्स्टिट्यूटकरुन निर्मिती करण्यात येणाऱ्या कोव्हावॅक्स या लसीच्या आपत्कालीन वापराला डीसीजीआयने परवानगी दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.


अदर पुनावाला यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. नोव्हावॅक्स या लसीचा वापर हा जगभरातील 12 वर्षे वयोगटावरील मुलांच्या लसीकरणासाठी करण्यात येत आहे. आता ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचं स्पष्ट झालंय. भारतात या लसीची निर्मिती सीरमकडून करण्यात येत असून त्यासंबंधीचे सर्व संशोधन पूर्ण झाले आहे. या लसीच्या आपत्कालीन वापराला डीसीजीआयने मान्यता दिली आहे. ही लस 12 वर्षे वयोगटावरील सर्वांना देण्यात येणार आहे. त्याखालील वयोगटातील मुलांसाठीही लवकरच लस आणली जाईल असा विश्वास अदर पुनावाला यांनी व्यक्त केला आहे.


 






भारतातील अॅस्ट्राजेनिकाच्या सहकार्याने ऑक्सफर्डची कोरोना लस तयार करणार्‍या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 'कोव्होवॅक्स' लसीची निर्मिती केली असून त्याच्या आपत्कालीन वापरासाठी डीसीजीआयने मान्यता दिली आहे.


अमेरिकन नोव्हावॅक्स कंपनीने त्यांची कोरोनावरची लस ही 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा त्यांच्या तिसऱ्या टप्प्याच्या ट्रायलनंतर केला होता. गेल्या वर्षी कोरोनाशी लढण्यासाठी ज्या लसींकडे जगाचे लक्ष होतं, त्यापैकी एक लस ही नोव्हावॅक्स होती. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर ही लस 90 टक्के प्रभावी असून हलक्या स्वरुपाची लक्षणे असणाऱ्यांना 100 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला होता.


संबंधित बातम्या: