कष्ट करणाऱ्यांनाच फळ मिळते ही गोष्ट आर्या राजगोपाल नावाच्या मुलीने खरी करून दाखवली आहे. आर्याला कानपूरमधील पेट्रोलियम   इंजिनीयरमध्ये पोस्ट ग्रॅज्यूएशनसाठी प्रवेश मिळाला आहे. तिचे वडिल हे पेट्रोलपंपावर काम करतात. आर्याच्या जिद्द आणि चिकटीबद्दलचे कौतुक करत  केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ट्विट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हरदीप सिंह पुरी यांनी आर्या आणि तिच्या वडीलांचा फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले,'आर्याने तिचे वडील श्री राजगोपाल यांचे आणि देशाच्या ऊर्जा क्षेत्रासोबत जोडल्या गेलेल्या आम्हा सर्वांची मान उंचावली आहे आहे. बाप-लेकीची ही जोडी न्यू इंडियासाठी रोल मॉडेल ठरली आहे. माझ्या तुम्हाला शुभेच्छा.'






इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमन श्रीकांत माधव वैद्य यांनी ट्विटरवर फोटो शेअर करून लिहिले की, 'इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या राजगोपाल यांची मुलगी आर्या हिची प्रेरणादायी गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे. आर्याने आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश मिळवून सर्वांची मान उंचवली आहे. आर्याला शुभेच्छा. '  त्याचप्रमाणे आर्याला अनेकांनी सोशल मीडियावर तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


 






'द बेटर इंडिया' ने त्यांच्या रिपोर्टमध्ये लिहिले, आर्याची गोष्ट ही केवळ शौक्षणिक यशाची गोष्ट नसून तिच्या धैर्य आणि दृढ संकल्पाची गोष्ट आहे. मुलीचे भविष्य उज्वल होण्यासाठी राजगोपाल गेली 20 वर्ष पेट्रोल पंपावर काम करत आहेत. वडीलांचे कष्ट आणि तिची मेहनत या सर्व गोष्टींमुळे आर्याने तरूण पिढीला प्रोत्साहित केले आहे. आर्या आता IIT कानपूरमधून ट्रोलियम इंजीनियर होणार आहे. या आधी तिने राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानमधून शिक्षण घेतले. सोशल मीडियावर सध्या आर्याची ही यशोगाधा व्हायरल होत आहे.