Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) जनतेसाठी कधी खुलं होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच आता अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जाहीर झाली आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, 15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊ शकते.
प्राणप्रतिष्ठेच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवलं जाईल, असं नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितलं. प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील, असंही ते म्हणाले. मिश्रा पुढे म्हणाले की, 24 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे. अयोध्येसाठी हा फार मोठा उत्सव असेल. देशभरातील काही ठिकाणी हा कार्यक्रम व्हर्चुअली दाखवला जाईल. परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये प्राणप्रतिष्ठा लाईव्ह पाहता यावी, यासाठी तयारी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान राम मंदिरातील गाभाऱ्याच्या मुख्यद्वारावर सोन्याचं कोरीव काम असणार आहे. तसंच मंदिराचा 161 फुटांचा कळसालाही सोन्याचं आच्छादन असेल.
30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार पहिला टप्पा
योध्येतील राम मंदिराचा पहिला टप्पा 30 डिसेंबरपर्यंत पूर्ण होणाार असल्याची नृपेंद्र मिश्रा यांनी दिली. 30 डिसेंबर 2023 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याच निर्णय ट्रस्टने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ग्राउंड फ्लोअरचे पाच मांडव पूर्ण करण्यात येण्यार आहे. यामध्ये एक प्रमुख गर्भगृह असणार ज्यामध्ये भगवान रामाच्या मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. या पाच मांडवाच्या निर्मितीसाठी जवळपास 160 खांब असणर आहे. तसेच आयकॉनोग्राफीचे काम देखील लवकर पूर्ण कण्यात येणार आहे. मंदिराच्या सर्वात खालच्या भागात भगवान रामाच्या दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणर आहे. तसेच वीज, पाणी या सारख्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येणर आहे. ही सर्व कामे 30 डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
30 डिसेंबर 2024 दुसरा टप्पा पूर्ण होणार
मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याविषयी माहिती देताना नृपेंद्र मिश्रा म्हणाले, मंदिराचा पहिला आणि दुसरा मजला 30 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. भगवान रामाची मूर्तीची स्थापना या वर्षाखेरपर्यंत करण्यात येणार आहे. तर 15 ते 24 जानेवारी 2024 पासून राम लल्लाचे दर्शन राम भक्तांना घेता येणार आहे. या वर्षाखेरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. संपूर्ण मंदिराचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार या प्रश्नाला उत्तर देताना समिती प्रमुख नृपेंद्र मिश्रा म्हणाले, डिसेंबर 2025 पर्यंत संपूर्ण मंदिराचे काम पूर्ण होणार आहे.
हेही वाचा