विशेष म्हणजे यापुढे रात्री 12 नंतर पेट्रोल किंवा डिझेल भरण्याची तुम्हाला सवय असेल तर ती सवयही आता मोडावी लागणार आहे. कारण आता रात्री 12 ऐवजी 6 पासून नवे दर लागू होतील.
नवीन दरांनुसार पेट्रोलचे दर काय?
- दिल्ली - 66 रुपये 91 पैसे प्रति लिटर
- मुंबई – 78 रुपये 44 पैसे प्रति लिटर
- कोलकाता – 69 रुपये 52 पैसे प्रति लिटर
- चेन्नई – 69 रुपये 93 पैसे प्रति लिटर
विविध शहरातील हे दर उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत कायम राहतील. त्यानंतर नव्या दरांनुसार पेट्रोल, डिझेलची विक्री केली जाईल. पेट्रोल पंप मालक आणि डिलर्स यांना फटका बसू नये, यासाठी देशभरातील 54 हजार पेट्रोल पंपांवर रात्री 12 ऐवजी सकाळी 6 वाजल्यापासून दर बदलतील.
पाच शहरात यशस्वी प्रयोग
कच्च्या तेलाचे दर नियमित ठरतात, त्यामुळे भारतातही दररोज दरात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जगभरातील अनेक विकसित देशांमध्ये हा नियम अगोदरपासूनच लागू आहे. तेल कंपन्यांनी उदयपूर, जमशेदपूर, पुद्दुचेरी, चंदीगड आणि विशाखापट्टणम या शहरांमध्ये प्रायोगिक तत्तांवर दररोज दर बदलण्याचा नियम लागू केला. या शहरांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर देशभरात हा नियम लागू करण्यात आला.