लखनऊ:  जात-पात, धर्म विसरुन माणसांना एकत्र आणणं हे भारतामधल्या सगळ्या सणांचं खरं महत्व. याचाच प्रत्यय उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये आला आहे.


 

गांधी फोरम संघटनेचे स्थानिक अध्यक्ष डॉ. अहमद यांनी आपल्या घरी जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली. महत्वाची गोष्ट म्हणजे अहमद यांच्या परिवारातले सर्व सदस्य या सोहळ्यात सहभागी होतात.

 

श्रीकृष्णाच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यापासून त्याच्या आरतीपर्यंत सर्व कामं अहमद आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या भक्तीभावाने करतात.

 

माणुसकीशिवाय कोणताही धर्म मोठा नसल्याचं अहमद यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अहमद यांचा आदर्श देशभरातील सर्व व्यक्तींनी घेतला तर आपला सामाजिक एकोपा कायम टिकून राहील.

संबंधित बातम्या

नऊ थर, 40 फूट, 11 लाखांचं बक्षीस, ठाण्यात मनसेची कायदाभंग हंडी

डोंबिवलीत पहिलीच हंडी 5 थरांची, कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन

दहीहंडीचे मनोरे 20 फुटापर्यंतच, नियम बदलणार नाही

दहीहंडी थराने नाही, तर मिसाईलने फोडायची का? राज ठाकरेंचा सवाल

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही मनसेची नऊ थरांची दहीहंडी

‘देशात हिंदूंनी सण साजरा करणं म्हणजे अपराध’, ‘सामना’तून बोचरी टीका

‘जय जवान’ची दहीहंडीसाठी सुप्रीम कोर्टात धाव