नवी दिल्ली : यास चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कशा पद्धतीने तयारी केली आहे याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्च स्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, टेलिकॉम, उर्जा, सिव्हिल एव्हिएशन, अर्थ सायन्स या खात्यांचे सचिव उपस्थित होते. या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते. 


 






बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचं 25 मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता असून 26 मे रोजी ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीवर यास नावाचे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्यानं यासंदर्भात माहिती दिली आहे.  


बंगालच्या खाडी परिसरात चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती पाहता हवामान खात्यानं ओडिशा येथील किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 'यास'  (Yaas ) हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्यास प्रशासनाला पूर्ण तयारीनिशी संकटाशी दोन हात करण्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


हे संभाव्य संकट पाहता भारतीय नौदलाने आपल्या चार युध्दनौकांसोबतच अनेक विमाने तयार ठेवली आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीलाच पश्चिम किनाऱ्यावर आलेल्या तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य केलं होतं. सध्याच्या घडीला चक्रीवादळाचा इशारा पाहता इथं एनडीआरएफची 17 पथकं, ओ़डीआरएफच्या 20 बटालियन आणि फायर सर्विसच्या 100 तुकड्या बचावकार्यासाठी तैनात असल्याचं कळत आहे. 


महत्वाच्या बातम्या :