पंडित अमित शुक्ल असं ऑर्डर रद्द करणाऱ्या युझरचं नाव असून तो मध्य प्रदेशच्या जबलपूरचा रहिवासी आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, "मी आताच झोमॅटोवरील ऑर्डर रद्द केली. कारण त्यांनी मुस्लीम डिलिव्हरी बॉयच्या हाती जेवण पाठवलं होतं. मी त्यांना डिलिव्हरी बॉय बदलण्यास सांगितलं, पण झोमॅटोने नकार दिला. मुस्लीमाच्या हातून आलेलं जेवण खाण्यासाठी तुम्ही माझ्यावर दबाव टाकू शकत नाही, तसंच मला रिफंडची गरज नाही."
यानंतर अमित शुक्लने झोमॅटोसोबत झालेल्या आपल्या संवादाचा स्क्रीन शॉटही शेअर केला. तसंच हा मुद्द्यावर आपल्या वकिलासोबत चर्चा करणार असल्याचं म्हटलं.
अमित शुक्लच्या या ट्वीटला उत्तर देताना झोमॅटोने म्हटलं की, "अन्नाचा कोणताही धर्म नसतो. अन्न हाच धर्म आहे."
झोमॅटोच्या उत्तरानंतर कंपनीचे मालक दीपांकर गोयल यांनीही या मुद्यावर ट्वीट केलं. ते म्हणाले की, अशाप्रकारने व्यवसायात नुकसान होत असेल तर काही हरकत नाही. आम्हाला भारताची विचारधारा आणि ग्राहक-भागीदारांच्या विविधतेचा अभिमान आहे. आमच्या या मूल्यांमुळे जर व्यवसायात कोणत्याही प्रकारचं नुकसान होत असेल, तर आम्हाला याचं दु:ख नाही."
झोमॅटोच्या ट्वीटचं कौतुक करणारे इतर ट्वीट