CRPF Raising Day : आज केंद्रीय राखीव पोलीस दलाचा (CRPF) 83 वा स्थापना दिवस साजरा केला जात आहे. या निमित्त जम्मू आणि काश्मीरमधील मौलाना आझाद स्टेडियममध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) सहभागी झाले. जवानांना संबोधित करताना गृहमंत्री शाह म्हणाले की, 2014 मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे.
जम्मू-कश्मीरमधील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्या सैन्याने राज्यातील दहशतवादावर नियंत्रण मिळविण्यात मिळवलेले मोठे यश. या कार्यक्रमात परेडचे निरीक्षण केल्यानंतर तेथे उपस्थित सैनिक आणि अधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले की, सीआरपीएफची वार्षिक परेड देशाच्या विविध भागात साजरी करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. देशाच्या आणि सीमांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले सैनिक देशाच्या विविध भागात जाऊन जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणे हा त्यामागचा उद्देश आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जवानांना सांगितले की, 'निवडणुका हा लोकशाहीचा सण आहे आणि निष्पक्ष निवडणुका हा लोकशाही देशाचा आत्मा आहे. भारतात जेव्हा जेव्हा लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका होतात तेव्हा देशभरात शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी CRPF महत्त्वाची भूमिका बजावते. सीआरपीएफने भारतातील नागरिकांना सुरक्षा आणि सुरक्षिततेची भावना देण्यासाठी दीर्घकाळापासून काम केले आहे. देशातील बिकट परिस्थितीत सीआरपीएफ जवानांमुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Coronavirus Cases Today : देशातील कोरोना रुग्णांमध्ये 18 टक्के घट, गेल्या 24 तासांत 2075 नवे कोरोना रुग्ण
- ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्राला सतर्क राहण्याच्या सूचना : डॉ. भारती पवार
- Job Majha : परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी, अर्जासाठी उरले दोन दिवस
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha