राजौरी (जम्मू-काश्मीर) : जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या 3 सैनिकांचा खात्मा केला.


जम्मूच्या आरएसपुरा आणि नौशेराजवळील सीमाभागात वारंवार पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात येतो आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात 7 जण जखमी झाल्याचीही माहिती मिळते आहे.

या गोळीबारानंतर भारतीय सैन्यानंही पाकिस्तानवर आक्रमण केलं. पाकिस्तानच्या 5 ते 6 रेंजर पोस्टला या गोळीबारात उद्ध्वस्त करण्यात भारतीय जवानांना यश आलं. या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर राजौरीतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.