मोदींवर टीका करताना पंतप्रधानपदाचा मान राखा : राहुल गांधी
एबीपी माझा वेब टीम | 13 Nov 2017 11:25 AM (IST)
'भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका करू शकता, पण त्याचवेळी पंतप्रधानपदाचा मान राखला पाहिजे.'
बनासकांठा (गुजरात) : भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका करु शकता, पण त्याचवेळी पंतप्रधानपदाचा मान राखला पाहिजे. अशा सूचना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मीडिया टीमला दिल्या आहेत. ते गुजरातमधील बनासकांठामध्ये बोलत होते. गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराचा जोर वाढला असून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. सोशल मीडियावरूनही प्रचाराला वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी बनासकांठामध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या सोशल मीडिया टीममधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर आपण टीका करू शकतो. पण मोदींवर टीका करताना पंतप्रधानपदाचा मान राखला पाहिजे. असंही त्यांनी कार्यकर्त्यांना बजावलं. संबंधित बातम्या : हार्दिक पटेलचे 10 सहकारी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार? ABP चा ओपनियन पोल : गुजरातमध्ये मोदी की राहुल गांधी? शिवसेना गुजरातमध्ये निवडणूक लढवणार सत्तेत आल्यानंतर जीएसटी पूर्णपणे बदलणार : राहुल गांधी आजोबांच्या गावात राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल!