Buddhadeb Refuses Padma Bhushan: देशांतील सर्वांत मानाच्या पुरस्कारांपैकी एक असणारे पद्म पुरस्कारांचे (Padma Awards) मानकरी नुकतेच जाहीर करण्यात आले. आज (25 जानेवारी) म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. 128 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री राहिलेले बुद्धदेव भट्टाचार्य (Buddhadeb Bhattacharjee) यांना देखील केंद्रातर्फे पद्मभूषण पुरस्काराचा मानकरी म्हणून घोषित करण्यात आलं. पण त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यास थेट नकार दिला आहे. पुरस्कारांची घोषणा होताच काही वेळातच त्यांनी हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं सांगितलं आहे.


समोर येणाऱ्या माहितीनुसार बुद्धदेव यांनी पुरस्कारांची घोषणा होताच पुरस्कार नाकारला असून ते म्हणाले, ''मला पद्म भूषण पुरस्काराबाबत काही माहिती नाही. मला याबद्दल काहीच कळवण्यात आलेलं नाही. तसंच मला अशाप्रकारे पुरस्कार जाहीर झाला असल्यास मी तो नाकारु शकतो.'' दरम्यान माकप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव यांच्या या निर्णयासोबत माकप पक्षाचा देखील हाच निर्णय़ असल्याचं माकप पक्षाच्या सूत्रांकडून समोर येत आहे.  


देशातील सर्वात मानाचा पुरस्कार


पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी पुरस्कार आहेत. या पुरस्काराची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाकडून केली जाते. दरवर्षी मार्च वा एप्रिल या महिन्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यात राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले पुरस्कारपत्र (सनद) तसेच एक पदक यांचा समावेश असतो. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha