Covishield, Covaxin : भारताच्या केंद्रीय औषध प्राधिकरणाच्या तज्ञ पॅनलने कोविड लसींना म्हणजेच कोविशील्ड (Covishield) आणि कोवॅक्सिनला (Covaxin) नियमित बाजार विक्रीसाठी मान्यता दिली. लसीसाठी मार्केट ऑथोरायझेशन लेबल दिले जाऊ शकते. SII आणि भारत बायोटेक या दोघांनी याची पुष्टी केली आणि विषय तज्ञ समिती (SEC) कडून मंजुरी मिळाली आहे.
सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) ने देखील ट्वीट केले की करून याबद्दल माहिती दिली आहे.CDSCO यांचे ट्वीट-
'सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या कोविड-19 वरील विषय तज्ञ समितीने (SEC) बुधवारी SII आणि भारत बायोटेकच्या अर्जाचे दुस-यांदा पुनरावलोकन केले, त्यांनी कोविशील्ड आणि कोवॅक्सिनला काही अटींचे पालन करून नियमित बाजारात विक्रीसाठी मान्यता देण्याची शिफारस केली आहे.' अशी माहिती पीटीआयनं दिली आहे.
रिपोर्टनुसार, जर कोविशील्ड आणि कोवॅक्सिनला बाजारात विक्रीसाठी मान्यता देण्यात आली तर त्या CoWin वर रजिस्टर असलेल्या दवाखान्यात आणि रुग्णालयात उपलब्ध होतील.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि भारत बायोटेक या फार्मा कंपन्यांनी ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे त्यांच्या संबंधित कोविड-19 लसी म्हणजेच कोविशील्ड आणि कोवॅक्सिनच्या नियमित बाजारात अधिकृत विक्रीला मान्यता मिळण्यासाठी अर्ज सादर केले होते.
कोविशील्ड आणि कोवॅक्सिन या लसींच्या आपत्कालीन वापरासाठी 3 जानेवारी रोजी मंजूर देण्यात आली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Omicron Variant : वाढत्या आजारांचा धोका! ओमायक्रॉन आणि प्रदूषणाचा फुफ्फुसांवर परिणाम
- Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक
- Covid19 Third Wave : दिलासादायक! भारतात दैनंदिन कोरोनारुग्ण संख्या 4 लाखांच्या पार जाणार नाही : शास्त्रज्ञांचा अंदाज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha