मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 43 हजार 697 नव्या रुग्णांची भर झाली असून 49 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 46, 591 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल राज्यात कोरोनाच्या 39 हजार 207 रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे आज चार हजार रुग्णांची वाढ झाली आहे
राज्यात आज 214 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 214 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 2074 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1091 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 49 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.93 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 69 लाख 15 हजार 407 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.04टक्के आहे. सध्या राज्यात 23 लाख 93 हजार 704 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 25 लाख 31 हजार 814 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत नवे 6 हजार 32 कोरोनाबाधित
मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता मुंबईतील रुग्णसंख्या स्थिरावल्याचं दिसून येत आहे. मुंबईत बुधवारी 6 हजार 32 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 488 झाली आहे. तर नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास तिप्पट रुग्ण म्हणजेच 18 हजार 241 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 95 टक्के इतका आहे.
इतर बातम्या :
- 150 किलोचा उमेदवार सहज उचलला, गुलालाने रंगवला, बीडमधला "व्हिडीओ ऑफ द डे"
- School Reopen : राज्यातील शाळा लवकरच सुरू होणार, आदित्य ठाकरेंचे संकेत
- Pune : अपहरण झालेला पुण्यातील चार वर्षाचा स्वर्णव सापडला; अपहरणाचं कारण अद्याप गुलदस्त्यात
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha