नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर अद्याप सुरुच आहे. अशातच देशात कोरोना व्हायरसचा खात्मा करण्यासाठी कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. देशात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात हेल्थवर्कर्सना कोरोना वॅक्सिन देण्यात येत आहे. तसेच प्रत्येक दिवशी कोरोना लस घेणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात 16 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


देशात कोरोना लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारीपासून झाली होती. तसेच 24 जानेवारीपर्यंत देशात 16,13,667 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. देशात कोरोना वॅक्सिनेशनमध्ये सर्वात पुढे कर्नाटक आहे. कर्नाटकात 1.91 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त उडीसामध्ये 1.52 लाखांहून अधिक, आंध्रप्रदेशात 1.47 लाखांहून अधिक, उत्तर प्रदेशात 1.23 लाखांहून अधिक आणि तेलंगाणामध्ये 1.10 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


जगभरातील लसीकरणाचा आकडा?


जर जगभरातील कोरोना लसीकरणासंदर्भात बोलायचं झालं तर, आतापर्यंत जगभरात 6 कोटींहून अधिक लोकांना कोरोना वॅक्सिन देण्यात आलं आहे. या प्रकरणात अमेरिका सर्वात पुढे राहिली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटींहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लस देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त चीनमध्ये 1.5 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. अशातच जगभरात सर्वात आधी कोरोना लसीकरणाची सुरुवात झालेल्या ब्रिटनमध्ये आतापर्यंत 63 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.


त्यानंतर इज्राइलचा क्रमांक येतो. इज्राइलमध्ये आतापर्यंत 24 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. जर्मनीमध्ये 16.3 लाखांहू अधिक लोकांना कोरोना वॅक्सिन देण्यात आलं आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक येतो. भारतात आतापर्यंत 16.1 लाखांहून अधिक लोकांना कोरोना वॅक्सिन दिलं गेलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


 Corona Vaccination Side Effects: तेलंगणामध्ये कोरोना लस घेतल्यानंतर महिला आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू