नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 24  हजार 492 रुग्ण  आढळले आहे. काल देशात 131 जणांचा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल २६ हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडले. 


आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या आता एक कोटी 14 लाख 9 हजार 831 इतकी झाली आहे. त्यामध्ये एकूण 1,58,856 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण एक कोटी 10 लाख 27 हजार 543 लोक कोरोनावर मात करुन बरे झाले आहेत. देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 2 लाख 23 हजार 432 इतकी झाली आहे.


कोरोना लसीकरणासाठी कोरोनाच्या संकेतस्थळावर (http://cowin.gov.in) नोंद करणं गरजेचं आहे. तसेच आरोग्य सेतू आणि कॉमन सर्व्हिस अॅपच्या माध्यमातून कोविन या अॅपवर नोंद करता येते. सरकारच्या या अॅपवर आणि संकेतस्थळावर नोंदणी करताना लोकांनी गर्दी केल्याने काही काळ या अॅप आणि संकेतस्थळाच्या कामामध्ये अडथळा आल्याचंही पहायला मिळालं.


लसीकरणासाठी एखादी व्यक्ती कोणत्याही राज्यात आपले नांव नोंद करु शकते. त्या-त्या राज्याने ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस देण्यात येणार आहे त्यांची नावे जाहीर केली आहेत. त्या आधारे आपण आपल्याला सोयीच्या हॉस्पिटलची निवड करु शकतो. यामध्ये 20 हजार पेक्षा जास्त खासगी हॉस्पिटलची यादीही आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची लस ही 250 रुपयांना मिळणार आहे. सरकारी हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत मिळणार आहे.


संबंधित बातम्या :